लखीमपूर हिंसाचार: महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा; ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर(Lakhimpur Kheri Violence ) काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला, त्यानंतर प्रियंका गांधी यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने जेल भरोची हाक दिली होती. मात्र आता महाविकास आघाडीनेच(Mahavikas Aghadi;) आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे.

  मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर(Lakhimpur Kheri Violence ) काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला, त्यानंतर प्रियंका गांधी यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने जेल भरोची हाक दिली होती. मात्र आता महाविकास आघाडीनेच(Mahavikas Aghadi;) आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे.

  तीनही पक्षांचे एकमत ११ ऑक्टोबरला बंद

  लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, येत्या ११ ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ११ ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय जयंत पाटील यांनी जाहीर केला.  हा बंद पक्षाच्या वतीने आहे मात्र महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबत देखील आम्ही बोलणार आहोत की त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील यांच्यासोबत पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

  मंत्रिमंडळ बैठकीत खेद आणि हुतात्मांना श्रद्धांजली

  लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी ११ ऑक्टोबरला बंद करणार आहोत.  मंत्रिमंडळाने देखील याबाबत खेद व्यक्त केला आणि हुतात्मांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजप क्रूरपणे वागून शेतकरी आंदोलन चिरडात आहे. संबंधित आरोपींना अटक देखील झाली नाही. त्यामुळे याचा देखील निषेध आम्ही करणार आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा पाठीशी शिवसेना नेहमी राहिली आहे, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर शेतकरी आंदोलन चिरडताना भाजपची मानसिकता दिसून आली, जनरल डायरच्या भूमिकेत भाजप दिसून आली, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

  उप्र चे सरकार गुन्हेगारांना मोकळे सोडते

  नबाब मलिक यांनी भाजप पदाधिका-यांच्या छापेमारीतील सहभगाबाबत  पाटील म्हणाले की, माहिती दिली म्हणून पकडू शकत नाही. दुरुपयोग होतो तेव्हा विश्वास उडतो.  शेतकरी विरोधात भाजप वागत आहे. सत्ता असलेल्या देशात शेतकऱ्यांना चिरडले जात आहे. अद्याप आरोपींना अटक केले नाही. उप्र चे सरकार गुन्हेगारांना मोकळे सोडते या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार ११ तारखेला बंद पाळणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून बंद पाळला जातो. पक्षाचा अध्यक्ष म्हणून घोषणा करतोय, पक्ष म्हणून बंद पुकारत आहे असे ते म्हणाले.