Lalbagh household gas cylinder explosion accident; Two died and five were in critical condition

मुंबई : लालबागमध्ये रविवारी सकाळी लग्नघरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होवून झालेल्या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. यात जखमी करीम (५०) यांचा मृत्यू साेमवारी दुपारी झाला तर या दुर्घटेनत ६२ वर्षीय सुशीला बंगेरा यांचा मृत्यू रविवारी रात्री उशीरा झाला असल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या दुगर्घटनेतील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून तीन जण किरकोळ भाजले होते.  या दोघांना सोमवारी दुपारी घरी सोडण्यात आले.  पाच जणांची प्रकृती स्थिर असल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाने सांगीतले. तसेच भायखळा येथ‌ील मसीना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगीतले.

लालबाग येथे रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गणेश गल्लीजवळील साराभाई ही तीन मंजली इमारत घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटाने हादरली. या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील कॅटरिंग व्यावसायीक मंगेश राणे यांची मुलगी पूजा हीचे ९ डिसेंबरला लग्न असल्याने त्यांच्या घरात रविवारी हळदीचा कार्यक्रम होता. यासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी मंगेश राणे त्यांचा मुलगा व कारागीर करीम(५०) जेवण बनवत होते. यावेळी गॅसची गळती सुरु झाली व या स्फोटात १८ जण होरपळले.

यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला तर उर्वरित रुग्णांवर पालिकेच्या केईएम व भायखळा येथील मसिना रुग्णालयात उपचार सुरु आहेत.