‘लालबागचा राजा’ आज सकाळी ११ वाजल्यापासून येणार ऑनलाइन; कोरोना महामारीमुळे भक्तांचा हिरमोड, घ्यावे लागणार ऑलनाइन दर्शन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने (lalbaugcha Raja sarvajanik ganeshotsav mandal) गेल्या वर्षी गणेशोत्सव रद्द करीत आरोग्यउत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. यंदाचे हे मंडळाचे ८८ वे वर्ष असून यंदा मंडळाने ४ फुटांची राजाचा प्रतिकृतीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार मंडळाने यंदा ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.

    मुंबई : मुंबईसह संपूर्ण भारतातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान मानले जाणाऱ्या लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी होते. कोरोनाच्या महामारीमुळे मंडळाने मात्र गणेशभक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची (Online Darshan) व्यवस्था केली असून शुक्रवारी राजाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन दर्शन सुरू केले जाईल, असे मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले. मंडळाच्या अधिकृत वेबसाईट इतर सोशल मीडियाच्या माध्यमांवर हे दर्शन घेता येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. (the official website of the board would be available on other social media platforms)

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने गेल्या वर्षी गणेशोत्सव रद्द करीत आरोग्यउत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. यंदाचे हे मंडळाचे ८८ वे वर्ष असून यंदा मंडळाने ४ फुटांची राजाचा प्रतिकृतीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार मंडळाने यंदा ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले. त्याबरोबरच कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून देखावा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी मंडळाच्या https://www.lalbaugcharaja.com/ या अधिकृत वेबसाईटवर भेट देण्याचे आवाहन अध्यक्ष कांबळे यांनी केले.