Cyber ​​police find thief stealing laptop of railway passengers; 3 laptops worth Rs 1.5 seized

रेल्वेच्या मध्य, हार्बर व पश्चिम मार्गांवर प्रवाशांचे लॅपटॉप चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सदर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरणचे पथक आरोपीचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसांनी तांत्रिक माहिती संकलित केली. तपासी पथकातील पोलीस नाईक प्रमोद दिघे यांनी तांत्रिक माहितीचे उत्तमरीत्या विश्लेषण केल्याने आरोपीची माहिती समजली. या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असतााना वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील सायबर तज्ज्ञ हवालदार सुरेश यल्ला यांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक शोधला. तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या एकूण तांत्रिक माहितीच्या आधारे लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपी रणजित सुनील ठाकरे (२८, भांडुप पश्चिम) याच्या मुसक्या आवळल्या.

    मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे लॅपटॉप चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या कारवाईमुळे मुंबई सेंट्रल व वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांची उकल झाली असून, एक लाख पाच हजार ३१० रुपयांचे लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. हा चोरटा हाती लागल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता तपासी पथकाने वर्तवली आहे.

    रेल्वेच्या मध्य, हार्बर व पश्चिम मार्गांवर प्रवाशांचे लॅपटॉप चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सदर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरणचे पथक आरोपीचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसांनी तांत्रिक माहिती संकलित केली. तपासी पथकातील पोलीस नाईक प्रमोद दिघे यांनी तांत्रिक माहितीचे उत्तमरीत्या विश्लेषण केल्याने आरोपीची माहिती समजली. या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असतााना वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील सायबर तज्ज्ञ हवालदार सुरेश यल्ला यांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक शोधला. तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या एकूण तांत्रिक माहितीच्या आधारे लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपी रणजित सुनील ठाकरे (२८, भांडुप पश्चिम) याच्या मुसक्या आवळल्या.

    रणजित ठाकरे याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीत असताना ठाकरे याची कसून चौकशी केली असता त्याने चोरलेले ३ लॅपटॉप राहत्या घरात ठेवल्याचे लोहमार्ग पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरातून ३ लॅपटॉप जप्त केले. हा आरोपी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रेल्वेच्या डब्यातील प्रवाशांच्या लॅपटॉपच्या बॅगा पळवत होता. त्यामुळे रेल्वे प्रवासात लॅपटॉप चोरीला गेले असल्यास लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रवाशांना केले आहे.

    सदर गुन्ह्याचा उलगडा मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद, मध्य व पश्चिम लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त प्रदीप चव्हाण, लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली विषेश कृती दलाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज साठे, पोलीस उपनिरीक्षक दीपक शिंदे, पोलीस हवालदार प्रशांत रेडेकर, पोलीस नाईक प्रमोद दिघे, पोलीस नाईक सतीश फडके, पोलीस नाईक जयेश थोरात, पोलीस अंमलदार रूपेश निकम व वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार सायबर तंत्रण सुरेश यल्ला यांनी केला.