कांजूरमार्गमध्ये मोठे लस साठवणूक केंद्र; ‘स्पुटनिक’ लशींचीही होणार साठवण

मुंबईत लस साठवणुकीसाठी कांजूरमार्गमध्ये आधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त असे केंद्र तयार केले असून येथे सुमारे १.५ कोटी लसीची मात्रा ठेवण्याची क्षमता या केंद्रात आहे. तसेच ‘स्पुटनिक’ लसीसाठी आवश्यक असणाऱ्या तपामानाचीही या केंद्रात व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

    मुंबई : मुंबईत लस साठवणुकीसाठी कांजूरमार्गमध्ये आधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त असे केंद्र तयार केले असून येथे सुमारे १.५ कोटी लसीची मात्रा ठेवण्याची क्षमता या केंद्रात आहे. तसेच ‘स्पुटनिक’ लसीसाठी आवश्यक असणाऱ्या तपामानाचीही या केंद्रात व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

    लसीच्या साठवणुकीसाठी पोषक वातावरण या केंद्रात तयार करण्यात आले आहे. देशातील काही भागात मोठ्या प्रमाणावर लस वाया गेल्याचे चित्र आहे. परंतु, मुंबईत लस वाया जाण्याचे प्रमाण नगण्य असून केवळ १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मुंबईत लस साठवणुकीसाठी कांजूरमार्गमध्ये आधुनिक केंद्र तयार केले असून येथे सुमारे दीड कोटी लसीची मात्रा ठेवण्याची क्षमता आहे. ‘स्पुटनिक’ लसीसाठी आवश्यक असणाऱ्या तपामानाचीही या केंद्रात व्यवस्था आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

    कांजूरमार्ग येथे पहिल्या मजल्यावर ४.५ कोटींचा खर्च करून हे केंद्र तयार केले आहे. येथे लस साठवणुकीसाठी दोन कुलर्स आहेत. एका कुलरची क्षमता २ अंश सेल्सिअसपर्यंत खाली तापमान करण्याची सोय आहे, तर दुसरे कुलर्समध्ये कमाल ८ अंश सेल्सिअस तापमानाची सोय आहे. सध्या मुंबईसह राज्यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन लसीचे डोस दिले जात आहेत. कोविशिल्ड ही ऑक्सफर्ड संशोधित आणि सीरम इन्िस्टट्युट निर्मित लस असून कोवॅक्सीन भारतीय बायोटेकने तयार केली आहे. तसेच आता रशियाची स्पुटनिक लसही भारतात दाखल झाली आहे.

    कांजूरमार्गच्या केंद्रात स्थलांतरित करता येऊ शकणारे कुलर्स आहेत. तसेच याचे तापमान २५ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत ठेवण्यात येते. त्यामुळे रशियाची लस येथे ठेवणे शक्य होणार आहे. रशियाच्या लसीसाठी १७ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असल्याचे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

    स्पुटनिक लसीच्या फ्रीजरमध्ये अतिरिक्त जागा असेल, याचा आम्हाला विश्वास आहे. तसेच या फ्रीजरमध्ये लाखोंच्या आसपास डोस सहज ठेऊ जाऊ शकतील. अलीकडेच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालिकेकडून आम्ही स्पुटनिक लसीचे एक कोटी डोस मागवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली होती. त्यासाठी पालिकेने ७०० कोटी खर्च करण्याचीही तयारी दर्शवली आहे.

    कांजूरमार्गमधील लस साठवणूक केंद्रात दोन कुलर्समध्ये प्रत्येकी ६० लाख डोस ठेवले जात आहेत. परंतु, काही तज्ज्ञांच्या मते एका कुलरमध्ये ९० लाखांच्या आसपास डोस साठवले जाऊ शकतात. पालिकेने लस साठवण्याची तयारी आधीपासूनच केली असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.