महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या २१ मेच्या स्मृतीदिनी विविध सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ

या कार्यक्रमाला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान उपस्थित राहणार आहेत. तर काँग्रेस पक्षाचे मंत्री व आमदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत.

  मंबई : कोरोनाच्या दुस-या लाटेने देशासह राज्यात अत्यंत कठिण परिस्थिती निर्माण झाली आहे. आपत्तीच्या काळात काँग्रेस पक्ष नेहमीच नागरिकांसोबत खंबीरपणे उभा राहिला आहे. या संकटकाळातही काँग्रेस पक्षाकडून सुरु असलेल्या जनसेवेच्या कामाला अधिक गती देण्यासाठी उद्या २१ मे रोजी स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गँड नालंदा हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, चेंबूर रेल्वे स्टेशजवळ पी. एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे आयोजित कार्यक्रमात विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

  समाजोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ

  माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या हौतात्म्य दिनी उद्या शुक्रवार दि. २१ मे रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली चेंबूर येथे आयोजित कार्यक्रमात राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात येणार असून विविध समाजोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

  या कार्यक्रमाला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान उपस्थित राहणार आहेत. तर काँग्रेस पक्षाचे मंत्री व आमदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत.

  मंत्री – आमदारांचे एक महिन्याचे वेतन दिले

  कोरोनाच्या काळात अगदी सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाकडून गोरगरीब, मजूर कामगार, नागरिकांना मदत करण्यात येत आहे. लसीकरणाच्या मोहिमेला मदत म्हणून काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्री व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन दिले आहे. सातत्याने गरज असेल तिथे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या कार्यालयात सुरु असेलल्या कोविड सहायता मदत केंद्रामार्फत दररोज हजारो नागरिकांना आवश्यक ती मदत केली जात आहे.