सचिन वाझे जाणार की मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग? रात्री उशिरापर्यंत खलबतं, आज निर्णयाची शक्यता

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विधानसभेत विरोधक भाजपाने गोँधळ घातल्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची बदली इतर विभागात करणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेत दिले होते. त्यानंतर वाझे यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी काही दिवसांपूर्वी त्यांची जग सोडून देण्याची वेळ झाली आहे, ही सोशल मीडियावरची पोस्टही चांगलीच चर्चेत आली आहे. अधिवेएशन संपताना मुख्यमंत्र्यांनी वाझे हे काही ओसामा बिन लादेन नाहीत, असे सांगून या प्रकरणात सचिन वाझे यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला होता

  मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली विस्फोटके आणि या गाडीशी संबंधित असलेले ठाण्यातील मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. संशयास्पद मर्सिजिड प्रकरणी सचिन वाझे यांचे कपडे आणि काही लाखांची रोकड एनआयएच्या हाती लागली असल्याची माहिती आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री महत्त्वाची बैठक घेतली, या बैठकीत सुरुवातीला पोलीस महासंचालक हेमंत नगराळे,  मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेही उपस्थित होते. त्याचबरोबर काही काळाने गृहमंत्री अनिल देशमुख हेही या बैठकीत उपस्थित राहिले. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरु होती.

  या बैठकीत संसदीय कामकाज मंत्री आणि परिवहनमंत्री अनिल परबदेखील उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चचर्चेनंचर आज (बुधवारी) सकाळी दहा वाजता सह्याद्री अतिथिगृहावर महाविकास आघाडीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यातच सचिन वाझे किंवा मुंबई पोलीस आय़ुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीची, निलंबनाची किंवा बडतर्फीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रजनीश शेठ यांची मुंबईच्या पोलीस आय़ुक्तपदी वर्णी लागेल, अशी चर्चा आहे. त्यांनी मंगळवारी दुपारी गृहमंत्र्यांशी याबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे.

  मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विधानसभेत विरोधक भाजपाने गोँधळ घातल्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची बदली इतर विभागात करणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेत दिले होते. त्यानंतर वाझे यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी काही दिवसांपूर्वी त्यांची जग सोडून देण्याची वेळ झाली आहे, ही सोशल मीडियावरची पोस्टही चांगलीच चर्चेत आली आहे. अधिवेएशन संपताना मुख्यमंत्र्यांनी वाझे हे काही ओसामा बिन लादेन नाहीत, असे सांगून या प्रकरणात सचिन वाझे यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर वाझे यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होते.

  काही वर्षांपूर्वी याच वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि शिवसेनेचे सरकार आल्यानंतर वाझे हे घाटकोपरच्या ख्वाजा युनुस प्रकरणात संबंधित असतानाही, त्यांची पुन्हा पोलीस दलात नियुक्ती झाली होती. तीही वादात आहे. त्यातच टीआरपी घोटाळा प्रकरणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणात हिरेन यांच्या कुटुंबियांनी वाझे यांचे नाव घेतल्यानंतर, या प्रकरणी वाझे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या प्रकरणी सुरुवातीला राज्य सरकारने ही चौकशी एटीएसकडे सोपवली असली, तरी ती केंद्राच्या एनआयएच्या ताब्यात गेली आहे. एनआयएच्या पथकाने गेल्या दोन तीन दिवसांपासून वाझे यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे , त्यांच्या घरावरही एनआयएने छापा घातला असून, अधिक पुरावे जमा करण्याचा प्रयत्न एनआयए करीत आहे.

  एनआयएच्या तपासात मर्सिडिज गाडी हे सचिन वाझे हेच वापरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या गाडीतून काही कपडे आणि रोकडही जप्त करण्यात आली आहे. हे सर्व संशयाची सुई वाझे यांच्याकडे तसेच पोलीस प्रशासनाकडे वळवणारे आहे.
  विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला असून, मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर खंडणी वसूल करण्याठी हा कट करण्यात आल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून, सातत्याने करण्यात येतो आहे. यातच राज्याचे पर्यंटन मंत्री आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आणि युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांच्यावरही भाजपाचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केले आहेत.

  यावर महाविकास सरकारचे तारणहार शरद पवार हेही सक्रिय झाले असून, त्यांनी या प्रकरणात डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला आहे. याबाबत त्यांनी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहेच, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशीही चर्चा केली आहे. माध्यमात सातत्याने होणाऱ्या चर्चेनुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पद जाणार नसल्याचे स्पष्टीकरणही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे.

  मंगळवारी सकाळच्या सुमारास या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांचीही दिल्लीत बैठक झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबरच मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शरद पवार हे सरकारवर नाराज नसल्याचे सांगत, महाविकास आघाडी दृढ असल्याचे सांगितले आहे. या सगळ्या स्पष्टीकरणानंतरही मंगळवारी रात्री याबाबत वर्षावर बैठक होत असल्याने, राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
  आता या प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर कारवाई होणार का, की मुंबईच्या पोलीस आय़ुक्तपदाचा कार्यभार दुसऱ्यांकडे सोपवला जाणार, हा खरा प्रश्न आहे.