लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर करणार ‘या’ राजकीय पक्षात अधिकृत प्रवेश

गेल्या महिन्यातच सुरेखा पुणेकर यांनी पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. आता अखेर त्या राष्ट्रवादी काॅंग्रसेमध्ये प्रवेश करणार आहे.

    मुंबई: प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची पक्ष प्रवेशाची तारीखअखेर  निश्चित झाली. सुरेख पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. १६ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या हाती घड्याळ बांधणार आहे.

    गेल्या महिन्यातच सुरेखा पुणेकर यांनी पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. आता अखेर त्या राष्ट्रवादी काॅंग्रसेमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांच्या प्रवेशाच्या बातमीने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

    याबरोबरच विधान परिषदेवर आमदार होण्याची इच्छा असताना सुरेखा पुणेकर यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या प्रवेशाच्या चर्चांना उधान आले होते. आता अखेर प्रवेश झाला आहे तर तमाशाचे फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर आता राजकारणाचे फड रंगवणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.