महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था नेहमीच शीर्षस्थानी आहे : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र हे असे राज्य आहे, जिथे महाराष्ट्र हे असे राज्य आहे की जेथे कायदा व सुव्यवस्था नेहमीच शीर्षस्थानी असते, हे कायद्याचे राज्य आहे,

मुंबई : सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी चाहत्यांनी केली होती. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा झटका बसला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सीबीआयला तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुंबई पोलीसांनी सीबीआयला या प्रकरणात सहकार्य करावे असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. 

या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र हे असे राज्य आहे, जिथे महाराष्ट्र हे असे राज्य आहे की जेथे कायदा व सुव्यवस्था नेहमीच शीर्षस्थानी असते, हे कायद्याचे राज्य आहे, येथे सत्य आणि न्याय कायमच प्रचलित आहे. येथे पोलीस, न्यायालयीन यंत्रणा आणि सरकारने नेहमीच पाहिले आहे की एखादी व्यक्ती कितीही मोठी किंवा छोटी असली तरीही कायद्यापेक्षा वरचढ कोणी नाही. असे संजय राऊत यांनी मुलाखती दरम्यान वक्तव्य केले आहे.