लेज ने लाँच केले नवीन @ ‘होम’ पॅक; आता घरबसल्या मनोरंजनासह घ्या आस्वाद तेही ४ फ्लेवर्समध्ये

या नवीन, मोठ्या आकाराच्या पॅकचे एक मोहक नाव आहे, वाह ! (WAH!) - 'वर्क अ‍ॅट होम' पॅक आणि आह ! (AAH!) - 'अड्डा अ‍ॅट होम' च्या माध्यमातून क्षणांना मजेदार आणि आनंददायक बनवतात.

    मुंबई : सद्य परिस्थितीमुळे बहुतेक लोक घरातच आहेत, ज्यामुळे त्यांनी आपली घरे काम, करमणूक आणि मित्रांसह मनोरंजनासाठी एक उत्तम जागा म्हणून बनविली आहेत. हे लक्षात घेऊन, भारताच्या सर्वात आवडत्या बटाटा चिप ब्रँड लेजने खास ‘@Home’ पॅक बाजारात आणला आहे. लेज ने नेहमीच आपल्या स्वादिष्ट स्वादांशिवाय वेगळ्या नाविन्यपूर्ण भेटींद्वारे ग्राहकांच्या जीवनात आनंद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. लेज ने लाँच केलेले ‘नवीन’ @ होम ‘पॅक, चार लेस फ्लेवर्सच्या स्वादांमध्ये उपलब्ध आहेत.

    ‘वर्क अ‍ॅट होम’ पासून ‘मूव्ही वॉचिंग अ‍ॅट होम’ आणि ‘ अड्डा अ‍ॅट होम’ तसेच ‘वीकेंड आऊटिंग अ‍ॅट होम’ पर्यंत, अशा प्रत्येक प्रसंगी, मित्र आणि प्रियजनांबरोबर आनंद घेण्यासाठी ले – पॅक आहे. या नवीन, मोठ्या आकाराच्या पॅकचे एक मोहक नाव आहे, वाह ! (WAH!) – ‘वर्क अ‍ॅट होम’ पॅक आणि आह ! (AAH!) – ‘अड्डा अ‍ॅट होम’ च्या माध्यमातून क्षणांना मजेदार आणि आनंददायक बनवतात.

    यावेळी पेप्सीको इंडियाच्या मार्केटिंग – फुड्सचे वरिष्ठ संचालक अंशुल खन्ना म्हणाले की, “आम्ही आमच्या ग्राहकांच्या जीवनातील दररोजचे क्षण विशेष बनवण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. आमची नवीन मोहीम ‘ घर पर लेज, ऑलवेज़!’ हि या दिवसांत लोक घरांमध्ये वेळ व्यतीत करत आहेत हे ध्यानात ठेऊन तयार करण्यात आली आहे -मग ती वेळ घरांमधून काम करत असो किंवा मित्रांसमवेत असो. ईशान खट्टर यांच्याशी आम्ही प्रथमच असोसिएट केले आहे. ईशान आजच्या तरुणांच्या भावना प्रतिबिंबित करतो, टीव्हीसीमध्ये प्रदर्शित झालेल्या क्षणांतून ईशानच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांशी आपला संबंध अधिकाधिक दृढ करण्याचे आमचे ध्येय आहे. आम्हांला खात्री आहे की, आमच्या ग्राहकांना देखील नुकतेच लाँच करण्यात आलेले खास इन-होम पॅक नक्कीच आवडतील आणि त्यांना त्यांच्या अनुभवाचा भाग बनवतील”

    नवीन लेजचे ‘@ होम पॅक आता भारतातील सर्व आघाडीच्या किरकोळ आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर रु. २०/-, रु. ३०/-, रु. ५०/- आणि रु. ८५/- या किंमतीत उपलब्ध आहेत.