मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालय

कोरोना काळात गरजू व्यक्तिंना सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांकडून औषधांचा पुरवठा करण्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने या कोरोनाच्या औषधांच्या दर्जाची हमी कोण देणार? अशी विचारणा केली आहे. नागरिकांच्या जीवाची आम्हाला चिंता आहे. कोणतीही लोकप्रियता यामधून मिळवण्याचे कारण नाही. जर गरजूंना मदत मिळत नसेल तर हे फार वेदनादायक असून ही परिस्थिती अत्यंत खेदनजक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात सेलिब्रिटी आणि राजकारण्यांकडून होणाऱ्या कोरोना औषध वाटपासंबंधी माहिती सादर केली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि जी एस कुलकर्णी यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली.

    मुंबई : कोरोना काळात गरजू व्यक्तिंना सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांकडून औषधांचा पुरवठा करण्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने या कोरोनाच्या औषधांच्या दर्जाची हमी कोण देणार? अशी विचारणा केली आहे. नागरिकांच्या जीवाची आम्हाला चिंता आहे. कोणतीही लोकप्रियता यामधून मिळवण्याचे कारण नाही. जर गरजूंना मदत मिळत नसेल तर हे फार वेदनादायक असून ही परिस्थिती अत्यंत खेदनजक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात सेलिब्रिटी आणि राजकारण्यांकडून होणाऱ्या कोरोना औषध वाटपासंबंधी माहिती सादर केली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि जी एस कुलकर्णी यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली.

    ‘त्या’ व्यक्तींना आधी लस द्या

    लसींचा तुटवडा व लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असताना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला लसीकरणाबाबत महत्त्वाची सूचना केली आहे. लसीसाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग केलेल्या व्यक्तींना सर्वातआधी प्राधान्य द्या, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका आणि राज्य सरकारला केल्या आहेत.

    …तर अधिकारी वैयक्तिकरीत्या जबाबदार

    ऑक्सिजनअभावी किंवा तुटवड्यामुळे एखादीही दुर्घटना घडल्यास, शपथपत्र सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल, असे औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यु. देबडवार यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेवरील सुनावणीत स्पष्ट केले.