महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यानमाला १७ जानेवारीपासून

फुले-शाहू-आंबेडकर विचार व्याख्यानमालेअंतर्गत रविवार १७ जानेवारी पासून महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी व्याख्याने खासदार सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवर पाहता येणार आहेत. याविषयी खा. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून याविषयी माहिती दिली.

  • खासदार सुप्रिया सुळे यांच्या फेसबूक पेजवरून होणार प्रसारण

मुंबई (Mumbai).  फुले-शाहू-आंबेडकर विचार व्याख्यानमालेअंतर्गत रविवार १७ जानेवारी पासून महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी व्याख्याने खासदार सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवर पाहता येणार आहेत. याविषयी खा. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून याविषयी माहिती दिली.

व्याख्यानमालेत महात्मा फुले यांची वैचारिक जडण-घडण, अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य, स्त्रीशिक्षण व इतर शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, सत्यशोधक समाज, यासोबत त्यांचे साहित्यिक कार्य यांसारख्या विविध पैलूंचा सर्वांगिण आढावा घेणारी नामवंत लेखक, साहित्यिक व अभ्यासकांची व्याख्याने ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे. व्याख्यात्यांमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सत्यशोधक चळवळीचे शिलेदार डॉ. बाबा आढाव यांच्यासह प्रख्यात लेखक व संशोधक प्रा. हरी नरके, ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजन गवस, प्राध्यापक डॉ जास्वंदी वांबूरकर यांचा समावेश असणार आहे.