मराठा आरक्षणप्रश्नी कायदेशीर बाबींवर चर्चा झाली ; मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर संभाजीराजेंची माहिती.

आरक्षणात कायदेशीर अडचणी आहेत त्यावर कोणत्या प्रकारे मार्ग काढण्यात येईल, याविषयी चर्चा झाली. सर्व पक्षांनी एकत्र येऊन या प्रश्नी काम करावे, अशी भूमिका मांडली आहे. तसेच गड किल्ले संवर्धन आणि राज्याभिषेक सोहळ्याविषयी चर्चा देखील झाली

    मुंबई: भाजप खासदार संभाजी राजे छत्रपती यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, आशुतोष कुंभकोणी यांच्या  उपस्थिती होते. यावेळी सुमारे ४५ मिनीटे ही चर्चा झाली.

    सर्वानी एकत्र येऊन काम करावे
    या बैठकीत प्रमुख्याने आरक्षणात कायदेशीर अडचणी आहेत त्यावर कोणत्या प्रकारे मार्ग काढण्यात येईल, याविषयी चर्चा झाली. सर्व पक्षांनी एकत्र येऊन या प्रश्नी काम करावे, अशी भूमिका मांडली आहे. तसेच गड किल्ले संवर्धन आणि राज्याभिषेक सोहळ्याविषयी चर्चा देखील झाली, असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, ज्या कामासाठी येथे आलो आहे त्यादृष्टीने चर्चा सकारात्मक झाली आहे, त्याबाबत माझी भूमिका पत्रकार परिषदेत व्यक्त करेन.

    सरकारच्या हाती आहेत ते देण्यात अडचण काय
    दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना खा संभाजी राजे म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकार असताना आरक्षणाच्या मुद्यावर निर्णय आला आहे म्हणून या सरकारने आता मागच्या काळात काय झाले किंवा नाही यावर राजकारण न करता समाजाला न्याय देण्याचे काम करावे अशी विनंती केली. ते म्हणाले की, कायदेशीर जो काही मार्ग काढायचा आहे त्यावर भोसले समितीचा अहवाल ३१ तारखेला येणार आहे काही विषय मात्र राज्य सरकारच्या हाती आहेत ते देण्यात काही अडचणी नाहीत त्यामुळे त्याबाबत राज्य सरकारने येत्या सात तारखेपर्यंत ठोस नियोजन करून निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.  त्या मागण्या देखील संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्या