आमदारांना कोरोनाच्या धास्तीमुळे मिळेना घर, हॉटेलमध्ये ठेवण्याचा विधानसभेचा निर्णय

हॉटेलमध्ये निवासासाठी ठेवल्यास आमदारांना देण्यात येणाऱ्या १ लाख रुपयांचा हॉटेलमधील खर्चासाठी वापर केला जाणार आहे. तसेच या रुममध्ये आमदारासह १ व्यक्ती राहण्याची मुभा मिळेल. मनोरा आमदार निवास इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यास ३ वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे हॉटेलसोबत करार करण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे(Corona Fear) नागरिकांना भाड्याने घर मिळत नाही आहे. तशीच परिस्थिती आमदारांबाबत घडली आहे. मुंबईतील आमदारांना कोरोनाच्या भीतीमुळे कोणी भाड्याने घर देत नाही आहे.(MLAs did not get a house due to Corona’s fear) त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आमदारांसाठी हॉटेलच्या खोल्या भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार निवासच्या इमारती पाडण्यात आल्या असून नव्या इमारतींचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे आमदारांना निवासासाठी दर महिना १ लाख रुपये देण्याचा फडणवीस सरकारने निर्णय घेतला होता. परंतु कोरोनामुळे परिस्थीतीमध्ये बदलाव झाला आहे. आमदारांकडे मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. यामुळे कुलाबा आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आमदारांना घर भाड्याने देण्यास नाकारले आहे. अशा तक्रारी येऊ लागल्याने पुढील ३ वर्षांसाठी १५० आमदारांची राहण्याची सोय हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.