“राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक” -अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला

लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही" - अतुल भातखळकर

    मुंबई:अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणात कथित जमीन घोटाळा प्रकरण देशभरात चांगलेच गाजत आहे. याच संधीचा फायदा घेत शिवसेनेकडून सातत्याने भाजपवर निशाणा साधला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावर “सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा” असं ट्विट करत भाजपचे अतुल भातखळकर यांनी शिवसेनाला प्रतिउत्तर दिले आहे.

    “राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम…” असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    राम मंदिर निर्माणात काही घोटाळा झाला असेल, तर त्यात स्वतः पंतप्रधान मोदींनी लक्ष घालायला हवे. शिवसेनेने आपल्या मुखपत्र ‘सामना’त मंगळवारी म्हटले आहे, की राम मंदिर कामाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि प्रामाणिकपणे व्हायरल हवी. कारण ती एक राष्ट्रीय गौरवाची गोष्ट आहे. असे संजय राऊत यांनीही ट्रस्टवर निशाणा साधला होता. .

    “लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही” असं देखील याआधी अतुल भातखळकर यांनी म्हटलं होतं.

    .