आगे आगे देखो होता है क्या, ही तर फक्त सुरुवात आहे; गिरीश महाजनांचा ईशारा

या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे” असा इशारा महाजन यांनी दिला आहे.

    मुंबई : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहेत. महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्ष चांगवलाचं आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान अनिल देशमुख यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडीना प्रचंड वेग आला आहे. याचं पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

    ठाकरे सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा ही तर फक्त सुरुवात आहे” अशा शब्दात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सरकारवर निशाणा साधला. “राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरुवात असून पुढे अजून बरीच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो…होता है क्या?” असा इशारा महाजनांनी ट्विटरवरुन दिला.

    अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर  महाजन काय म्हणाले ?

    “निगरगट्ट ठाकरे सरकारने पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे” असा इशारा महाजन यांनी दिला आहे.