वाझे प्रकरणाच्या गदारोळात संजय राठोडचे पाप झाकले जाणार नाही याची काळजी घेऊ’ : अतुल भातखळकर

वाझे प्रकरणाच्या गदारोळात संजय राठोडचे पाप झाकले जाणार नाही याची काळजी घेऊ...पूजा चव्हाणला न्याय मिळायलाच पाहिजे असं ट्विट भाजपा आमदार उतुल भातखळकर यांनी केलं आहे.

    मुंबई : पूजा चव्हाण (pooja chavhan)  या २२ वर्षीय तरुणीने पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. पूजा चव्हाण प्रकरणात रोज नवनवीन पुरावे भाजपच्या हाती लागत होते. या प्रकरणात मंत्री संजय राठोड (sanjay rathod)  असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. विरोधी पक्ष आक्रमक झाल्यामुळे संजय राठोड यांना अधिवेशनापूर्वी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

    दरम्यान पूजा चव्हाणला न्याय मिळवून देणारच, हे प्रकरण मागे पडू देणार नाही, अशी ग्वाही भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे. त्यामुळे संजय राठोड प्रकरणात विरोधक महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यात भाजप नेते कोणतीही कसूर सोडत नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.

    वाझे प्रकरणाच्या गदारोळात संजय राठोडचे पाप झाकले जाणार नाही याची काळजी घेऊ…पूजा चव्हाणला न्याय मिळायलाच पाहिजे असं ट्विट भाजपा आमदार उतुल भातखळकर यांनी केलं आहे.