अंधेरी घाटकाेपर लिंक राेडला तडे! कामाची गॅरेंटी संपण्याआधीच रस्ता झाला खराब; आता सल्लागारांवर पालिका खर्च करणार 10 काेटी

पूर्व आणि पश्चिम उपनगरातला जाेडणारा अंधेरी घाटकाेपर हा महत्वाचा रस्ता आहे. त्यावरून जड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता दुरूस्तीसाठी बंद करण्यात येवू शकत नसल्याने या रस्त्याचे अस्तित्वात असलेल्या सिंमेंट रस्त्यावर सिंमेंटीकरण करण्याचे डिझाईन मे. कन्स्ट्रमा कन्सलटंट प्रा. लि. यांच्याकडून तातडीने करण्यात येणार हाेते. मात्र नवीन रस्त्यावर तडे आढळल्यानंतर ही बाब पालिकेने कंत्राटदाराला कळविण्यात आली. त्यानुसार कंत्राटदाराला डिझाईन आणि आराखडे तपासण्यास सांगण्यात आले.

    मुंबई : रस्त्याला तडे गेल्याने पूर्व उपनगरातील अंधेरी घाटकाेपर लिंक राेडच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून या रस्त्याच्या कामासाठी सल्लागारावर पालिका आणखी 10 काेटी रुपये खर्च करणार आहे.

    पूर्व आणि पश्चिम उपनगरातला जाेडणारा अंधेरी घाटकाेपर हा महत्वाचा रस्ता आहे. त्यावरून जड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता दुरूस्तीसाठी बंद करण्यात येवू शकत नसल्याने या रस्त्याचे अस्तित्वात असलेल्या सिंमेंट रस्त्यावर सिंमेंटीकरण करण्याचे डिझाईन मे. कन्स्ट्रमा कन्सलटंट प्रा. लि. यांच्याकडून तातडीने करण्यात येणार हाेते. मात्र नवीन रस्त्यावर तडे आढळल्यानंतर ही बाब पालिकेने कंत्राटदाराला कळविण्यात आली. त्यानुसार कंत्राटदाराला डिझाईन आणि आराखडे तपासण्यास सांगण्यात आले.

    त्याप्रमाणे प्रा. अभय अंबाेले, व्हिजेटीआय यांच्या मार्फत रस्त्याची पाहणी करण्यात आली. रस्त्याचे हे काम तातडीने करायचे असल्याने तांत्रिक आणि भाैगाेलिक सर्वेक्षण करण्यासाठी 10 लाख रुपये खर्च हाेणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजूरीसाठी आला आहे. उद्या हाेणार्या समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. मात्र हमी कालावधीत या रस्त्याला तडे गेल्याने त्यावरून बैठकीत गदाराेळ हाेण्याची शक्यता आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]