…तरच सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो; अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई दुसऱ्या स्तरावर

मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल कधी सुरु होणार? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. दैनंदिन व्यवहार सुरु करण्याची मुभा देण्यात आली असली तरी लोकलबंदी कायम आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पाहूनच तिकीट देण्यात आहे. मात्र सध्या सामान्य मुंबईकरांसाठी लोकलची दारे बंदच असणार आहेत. मुंबई शहर व उपनगरे लॉकडाऊन शिथिलीकरणाच्या दुसऱ्या गटात येत आहेत. मुंबईत रुग्ण वाढीचा दर कमी झाला तरच सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. उपनगरीय रेल्वेशी संलग्न असलेला ठाणे जिल्हा पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा दिलेली नाही.

  मुंबई : मुंबईसह राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे, परंतु, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी आढळत आहेत, तेथे निर्बंधात शिथिलता देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार आता मुंबईत लॉकडाऊन अंशत: शिथिलता देण्यात आलेली आहे. तसेच मुंबईकरांना घरांच्या डागडुजीसाठीही पालिकेने परवानगी दिली आहे.

  राज्य सरकारने लॉकडाऊन हटवणे अथवा त्यात शिथिलता देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तथा पालिका आयुक्तांवर सोपवला आहे. त्यामुळे मुंबईतील अनलॉकबाबत आयुक्त इक्बालसिंह चहल आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या मते, अनलॉकबाबत प्रारूप तयार केल्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे परवानगीसाठी पाठवण्यात येईल. त्यांच्या परवानगीनंतर मुख्य सचिवांच्या माध्यमातून संबंधित महापालिकेला पाठवण्यात येईल, असे समजते.

  पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे आणि पालिकांसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रुग्णसंख्येत घट झाल्याने काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मुंबईत रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्के आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. मात्र कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. यासाठी प्रशासन काळजीपूर्वक पावले उचलताना दिसत आहे.

  दुसरीकडे मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल कधी सुरु होणार? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. दैनंदिन व्यवहार सुरु करण्याची मुभा देण्यात आली असली तरी लोकलबंदी कायम आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पाहूनच तिकीट देण्यात आहे. मात्र सध्या सामान्य मुंबईकरांसाठी लोकलची दारे बंदच असणार आहेत. मुंबई शहर व उपनगरे लॉकडाऊन शिथिलीकरणाच्या दुसऱ्या गटात येत आहेत. मुंबईत रुग्ण वाढीचा दर कमी झाला तरच सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. उपनगरीय रेल्वेशी संलग्न असलेला ठाणे जिल्हा पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा दिलेली नाही.

  गेल्या वर्षी कोरोनाचा पहिल्या लाटेत २२ मार्च २०२० पासून लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना परवानगी देण्यात आली. काही महिन्यांनंतर सर्वसामान्यांना वेळेची मर्यादा घालून प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने पुन्हा एकदा सामन्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली होती.

  डागडुजीस परवानगी

  करोना नियंत्रणात आल्याने निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने निर्बंध शिथिलतेच्या कालावधीत मुंबईकरांना घरांची डागडुजी करता येणार आहे. चाळी, इमारतींमध्ये छतातून पडणारे पावसाचे पाणी रोखणे, कोसळण्याच्या अवस्थेत आलेल्या भिंतींची डागडुजी करणे अशी कामे करण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. येत्या काही दिवसांत मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे पावसापूर्वी नागरिकांना घराची डागडुजी करावी लागते. पालिकेने परवानगी देऊन ही अडचण दूर केली आहे.

  सम­­-विषम पद्धतीने दुकाने सुरू

  चाळी आणि इमारतींमधील घराच्या छतातून पाणी गळती, इलेक्िट्रक वायरिंग सदोष राहिल्यास शाटॅसर्किटची भीती, पावसाचे पाणी घरात तुंबण्याचे प्रकार घडतात. अनेक ठिकाणी धोकादायक भिंती कोसळण्याच्या घटनाही घडतात. पावसाळापूर्व छतावर डांबरीकरण, मोडकळीस आलेल्या भिंतींची डागडुजी, घरातील लादीकरण व सिमेंट कोबा करणे, घराबाहेरील लहान झाडांची छाटणी करणे, जलवाहिनी दुरुस्ती करणे, छतावर प्लास्टिक टाकणे ही महत्त्वाची कामे येत्या काही दिवसांत करणे मुंबईकरांना शक्य होणार आहे. मुंबईत सोमवारपासून सम विषम पद्धतीने दुकाने उघडण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे हार्डवेअरची दुकान, प्लास्टिक विक्रीच्या दुकानातून योग्य त्या वस्तू खरेदी करत घरातील लहान मोठ्या दुरुस्ती करता येणार आहे.

  पावसाळ्यात मुंबईकरांच्या अडचणीत वाढ होऊ नये यासाठी घराची डागडुजी करता येणार आहे. मात्र ही कामे करताना प्रत्येकाला करोनासंबंधी सुरक्षित अंतर, मास्क व इतर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. काम करताना गर्दी टाळावी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डागडुजी करण्यासाठी पालिकेच्या संबंधित विभाग स्तरावर परवानगी घेणे बंधनकारक असेल.

  - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका