रेल्वे, एसटीसह इतर विभागातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी

मुंबई: अत्यावश्यक सेवेतील राज्य सरकारचे कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह आता रेल्वे, एसटी, बेस्टसहीत इतर कर्मचाऱ्यांनाही लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी याबाबत पश्चिम

 मुंबई: अत्यावश्यक सेवेतील राज्य सरकारचे कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह आता रेल्वे, एसटी, बेस्टसहीत इतर कर्मचाऱ्यांनाही लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी याबाबत पश्चिम रेल्वेने प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे. यात रेल्वेचे सर्व कर्मचारी, एमआरव्हीसी, आईआरसीटीसी, जीआरपी यांच्यासह एसटी, बेस्ट, सर्व मनपा परिवहन सेवेतील सर्व कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, मनपा शाळेतील शिक्षक, सरकारी आणि खासगी रुग्णालयांसह खासगी पॅथॉलॉजी लॅबचे कर्मचारी यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून सुरु केलेल्या लोकलमधून इतर सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. आता पश्चिम रेल्वेने ही परवानगी दिल्याने लोकलमधील गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे. अशा सगळ्या काळात मुंबई लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे आव्हान असणार आहे.