सर्व महिलांचा लोकल प्रवास अद्यापही लांबच, परवानगी कधी मिळणार?

सोमवारी पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रसिद्धीपत्रक काढून वाढीव प्रवाशांना लोकल प्रवास देण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट केले, परंतु कोरोनाकाळात प्रवासाबाबत कार्यपद्धती, रूपरेखा निश्चित होणे गरजेचे असून हे राज्य सरकार ठरवणार आहे आणि त्याची प्रतीक्षा असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे सर्वच महिलांचा (Local travel for all women is still long) लोकल प्रवास लांबलाच आहे

सोमवारी पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रसिद्धीपत्रक काढून वाढीव प्रवाशांना लोकल प्रवास देण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट केले, परंतु कोरोनाकाळात प्रवासाबाबत कार्यपद्धती, रूपरेखा निश्चित होणे गरजेचे असून हे राज्य सरकार ठरवणार आहे आणि त्याची प्रतीक्षा असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे सर्वच महिलांचा (Local travel for all women is still long) लोकल प्रवास लांबलाच आहे. मुंबई उपनगरीय लोकलमधून सरसकट सर्वच महिलांना प्रवासाची परवानगी (permission ) व त्याची नियमावली ठरवण्यावरून सध्या रेल्वे प्रशासन व राज्य सरकारमध्ये जुंपली आहे.

सध्या पश्चिम रेल्वे ७०० लोकल फेऱ्या चालवत असून गर्दीच्या वेळी दोन महिला विशेष फेऱ्यादेखील आहेत. तर मध्य रेल्वेवरही ७०६ फेऱ्या धावत आहेत. लोकलमध्ये, फलाटावर गर्दी होऊ नये, शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्हावे इत्यादी नियम राज्य सरकारकडून ठरवणे गरजेचे असल्याचेही पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

राज्य सरकारने केलेल्या मागणी किंवा सूचनानंतरच रेल्वेने विविध श्रेणींतील अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यास सुरुवात केली व त्यानुसार लोकल फेऱ्याही वाढवल्याचेही स्पष्ट केले. या पत्रानंतर राज्य सरकारकडून मात्र अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. त्यामुळे सर्वच महिलांना लोकल प्रवास कधी मिळणार असा प्रश्न आहे.