नवरात्रीपासून मुंबईत लोकल सुरु होणार ? आदित्य ठाकरे यांनी दिले संकेत

मुंबई : कोरोना संक्रम रोखणम्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्य जनतेसाठी बंद असलेली उपनगरीय लोकल सेवा नवरात्रीपासून पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. १५ ऑक्टोबरपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरु होण्याचे संकेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतील खासगी कार्यालये ऑक्टोबर मध्यापासून पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

खासगी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याबाबत विचार
मुंबई : कोरोना संक्रम रोखणम्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्य जनतेसाठी बंद असलेली उपनगरीय लोकल सेवा नवरात्रीपासून पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. १५ ऑक्टोबरपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरु होण्याचे संकेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतील खासगी कार्यालये ऑक्टोबर मध्यापासून पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. खासगी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याचा सरकारचा विचार आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांची गर्दी एकाच वेळी होणार नाही, तसेच वेगवेगळ्या वेळी काम करण्याची संधी कर्मचाऱ्यांना मिळेल, असे संकेत आदित्य यांनी दिले आहेत. खासगी कार्यालयांच्या वेळा बदलल्यास लोकलमधील गर्दी कमी होईल, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी हे संकेत दिले आहेत. अनलॉकच्या प्रक्रियेत खासगी कार्यालये हळूहळू सुरु होत आहेत, या कार्यालयांच्या वेळा २४ तास कराव्यात याबाबत सरकार काही कंपन्यांशी चर्चा करत असल्याची माहितीही आदित्य यांनी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता लोकल सुरु करण्यासाठी सरकारवर दबाव वाढत चालला आहे. आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या संकेतानुसार लोकल सेवा सुरु होण्यापूर्वी कार्यालयांच्या वेळात बदल होण्याची शक्यता आहे.

सर्वांसाठी लोकल सेवा सुरु व्हावी- हायकोर्ट
केवळ अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्यांसाठीही लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, असा सल्ला मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. अजून किती दिवस लोकलसेवा बंद ठेवणार असा सवाल मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी राज्य सरकारला विचारला आहे. वकिलांनाही लोकलमधून प्रवासाची परावनगी मिळावी, यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी मुख्य न्यायाधीशांनी हा मुद्दा उपस्थित केला. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत आहे. आता अनलॉकमध्ये व्यवहार सुरळीत होत असताना, सर्वसामान्यांच्या जाण्या-येण्याबाबत सरकारला विचार करावाच लागेल, असेही मुख्य न्यायाधीश म्हणालेत. मुंबईत प्रवास करणे अवघड झाले आहे, लोकांचे अनेक तास प्रवासात जात आहेत, अशा स्थितीत लोकोल सुरु करणे हा एकमेव पर्याय असल्याचेही कोर्टाने नमूद केले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकराने मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सुमारे ९२९ फेऱ्या सुरु आहेत. या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांत वकिलांचा समावेश करावा, या मागणीसाठी उदय वारुंजीकर आणि श्याम देवानी यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली होती. आता या प्रकरणी ५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत.