मुंबईतील लोकल केंद्र सरकारकडून पुढील आदेश येईपर्यंत राहणार बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुंबई लोकल बंदच राहणार असल्याचं सांगितलं आहे.याबाबतचे स्पष्टीकरण सरकारने प्रसिद्धीपत्रकाद्वारे अधिकृतरित्या दिले आहे. मुंबईतील लोकल आणि  रेल्वे सेवा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याचं यात सांगण्यात आलं आहे.

काय आहे प्रसिद्धीपत्रकात 

सध्या  २३० विशेष ट्रेन धावत असून त्या सुरुच राहणार  असून पुढील आदेश येईपर्यंत नियमित प्रवासी तसंच उपनगरीय रेल्वे सेवा बंद राहणार असल्याची नोंद घ्यावी,असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.दरम्यान, मुंबईत सध्या मर्यादित लोकल आणि विशेष ट्रेन धावत असून त्या सुरु राहणार आहेत.तसेच गरजेप्रमाणे त्यांची संख्या वाढवली जाईल. मात्र सध्यातरी  नियमित प्रवासी आणि उपनगरीय रेल्वे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.