Anil Parab's business partner found with Sachin Vaze's Prado car; Kirit Somaiya's sensational allegation

परब यांचे कार्यालय तोडण्याचे आदेश 2019 मध्येच देण्यात आले आहेत. मात्र पावसाळा असल्याचे कारण देत ही कारवाई टाळण्यात आली होती. त्यानंतर परब यांनी म्हाडावर दबावही आणला. ठाकरेंचा उजवा हात अलेल्या नार्वेकर यांचा बंगला तुटला तर परब यांचे कार्यालय कसे वाचवले जाऊ शकेल असे किरीट सोमय्या म्हणाले.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या अवैध बंगल्यावर कारवाई झाल्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कार्यालयांवरही कारवाई केली जाणार असल्याचा दावा माजी खासदार आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. किरिट सोमैय्या यांनी केला आहे.
    लोकायुक्तांनी आदेश दिल्याची माहिती दिल्याचेही सोमय्या यांचे म्हणणे आहे. सोमैया यांच्या मते लोकायुक्त यांनी परब यांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले असून गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर पासून ही कारवाई सुरू केली जाणार आहे.

    परब यांचे कार्यालय तोडण्याचे आदेश 2019 मध्येच देण्यात आले आहेत. मात्र पावसाळा असल्याचे कारण देत ही कारवाई टाळण्यात आली होती. त्यानंतर परब यांनी म्हाडावर दबावही आणला. ठाकरेंचा उजवा हात अलेल्या नार्वेकर यांचा बंगला तुटला तर परब यांचे कार्यालय कसे वाचवले जाऊ शकेल असे किरीट सोमय्या म्हणाले.

    लोकायुक्त वी. एम कानडे यांच्या पुढे झालेल्या सुनावणीत परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोकायुक्तांनी वांद्रे पूर्व येथील म्हाडा इमारत क्र. 57 व 58 मधील अनधिकृत बांधकाम एका महिन्याच्या आत पाडून त्याचा अहवाल लोकायुक्त कार्यालयाकडे म्हाडाने सुपुर्द करावा, असा आदेश दिला आहे.

    डॉ. किरिट सोमैय्या यांचे ट्विट