शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक

नुकतेच ओवळा-माजिवडा मतदारसंघातील मतदारांनी "कोरोना न होताही आमदार क्वॉरन्टीन," अशा आशयाचे फलक जागोजागी लावल्याने आमदार सरनाईक चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी (२६ मे) पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

    ठाणे : शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीवर ईडीने छापा टाकल्यानंतर त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार कायम आहे. या घटनेनंतर मागील दोन महिन्यांपासून आमदार प्रताप सरनाईक गायब आहेत. त्यांचा शोध घ्या, असं साकडं घालत भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि अधिकृत तक्रार नोंदवली.

    “तीन विविध घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने गेले दोन महिने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गायब आहेत. काय झालं, कोणी किडनॅप केलं, याची भीती मतदारांना वाटत आहे. तेव्हा, त्यांना शोधण्यासाठी कार्यवाही करावी,” असं म्हणत काल (२६ मे) भाजपा नेते किरीट सोमय्या, ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदर संजय केळकर आणि भाजप गटनेते मनोहर डुंबरे आदीच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची भेट घेतली.

    नुकतेच ओवळा-माजिवडा मतदारसंघातील मतदारांनी “कोरोना न होताही आमदार क्वॉरन्टीन,” अशा आशयाचे फलक जागोजागी लावल्याने आमदार सरनाईक चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी (२६ मे) पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसंच, सरनाईक हरवले आहेत, त्यांचं काय झालं, कोणी किडनॅप केलं? याची भीती मतदारांना वाटत आहे. त्यामुळे आमदार सरनाईक यांचा शोध घेण्यासाठी कार्यवाही करावी, अशी अधिकृत तक्रार पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.