परमबीर विरोधात लूक आऊट नोटीस; देशाबाहेर जाण्यास मज्जाव

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तपास सुरू आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही परमबीर सिंह यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याच्या वृत्ताचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) खंडन केले आहे. लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार परमबीर सिंह यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची लूक आऊट नोटीस जारी करण्यात आलेली नाही.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत सातत्योन वाढ होत आहे. खंडणी वसुली आणि भ्रष्टाचार प्रकरणात एसीबीने लुकआऊट नोटीस बजावली आहे. या नोटीसीमुळे त्यांना देशाबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, एसीबी पोलिस निरीक्षक अनूप डांगेच्या तक्रारीच्या आधारावरून परमबिर सिंह यांच्यावरील वसुलीच्या आरोपांची चौकशी करीत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे तथापि, या वृत्तात तथ्य नसल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात अकोला, नाशिक, कोपरी आदी ठिकाणी खंडणी, धमकावणे आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

    एसीबीने केले खंडण

    मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तपास सुरू आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही परमबीर सिंह यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याच्या वृत्ताचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) खंडन केले आहे. लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार परमबीर सिंह यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची लूक आऊट नोटीस जारी करण्यात आलेली नाही.

    15 कोटी वसुलीचाही आरोप

    परमबीर यांच्याविरोधात बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल याने 15 कोटी रुपयांची वसुली केल्याचीही तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात सिंह यांचा निकटवर्तीय बिल्डर संजय पुनमिया आणि सुरेश जैन यांना अटक केली आहे. या प्रकरणात परमबीर यांच्यासह डीसीपी अकबर पठाणसह सात आरोपी आहेत.