ED ची माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात Lookout notice नोटीस जारी; देश सोडण्यास परवानगी नाही

लूकआऊट नोटीसमुळे आता देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत.

    मुंबई: १०० कोटी रुपये खंडणी घोटाळ्या प्रकरणातील आरोपी माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Former Home Minister Anil Deshmuk) यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ED)ने लुकआऊट नोटीस(Lookout notice )काढली आहे. यापूर्वीही चौकशीसाठी संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुखांना पाचवेळा समन्स पाठवले होते, परंतु मात्र, चौकशीला हजर न राहिल्याने आता लूकआऊट नोटीस काढण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे माजी गृहमंत्र्यांना खरंच अटक होणार का? याकडे सगळ्यांच्या नजरा लागलया आहेत.

    राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लूकआऊट नोटीस काढलेली आहे, असा दावा अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी केला आहे. देशमुखांना लवकरच अटक होणार, असं जयश्री पाटील म्हणाल्या आहेत. ईडीने १०० कोटींच्या कथित वसूली प्रकरणात लूकआऊट नोटीस काढलेली आहे.

    लूकआऊट नोटीसमुळे आता देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्याखेरीज देशभरातील विमानतळांनादेखील नोटीस गेली आहे. जेणेकरून देशमुख हे देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांना विमानतळावरच थांबवले जाईल.