लुई फिलिपने लाँच केले १० स्तरांचे अँटि-व्हायरल, अल्ट्राप्रोटेक्ट डबल डिफेन्स मास्क

भारतात तयार करण्यात आलेल्या व नव्यानेच बाजारात आणलेल्या या श्रेणीचे नामकरण लुई फिलिप अल्ट्राप्रोटेक्ट डबल डिफेन्स असे करण्यात आले आहे. यामध्ये HeiQ व्हायरोब्लॉक या स्विस अँटि-व्हायरल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. HeiQ व्हायरोब्लॉक वस्त्रामध्ये विषाणूरोधक घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.

    मुंबई : लुई फिलिप या आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडच्या भारतातील आघाडीच्या प्रीमियम मेन्सवेअर ब्रॅण्डने अँटि-व्हायरल फेस मास्कची नवीकोरी श्रेणी बाजारात आणली आहे. विषाणू व जीवाणू अशा दोहोंपासून संरक्षण देण्याच्या उद्दिष्टाने हे मास्क तयार करण्यात आले आहेत. सध्याच्या कोविड साथीचा विचार करून ब्रॅण्डने अनन्यसाधारण आणि अशा प्रकारचे एकमेव १० स्तरांचे अँटि-व्हायरल मास्क, वापरकर्त्यांना कमाल संरक्षण व सुरक्षितता देण्याच्या उद्देशाने, तयार केले आहेत.

    भारतात तयार करण्यात आलेल्या व नव्यानेच बाजारात आणलेल्या या श्रेणीचे नामकरण लुई फिलिप अल्ट्राप्रोटेक्ट डबल डिफेन्स असे करण्यात आले आहे. यामध्ये HeiQ व्हायरोब्लॉक या स्विस अँटि-व्हायरल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. HeiQ व्हायरोब्लॉक वस्त्रामध्ये विषाणूरोधक घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे या वस्त्राच्या पृष्ठभागावर विषाणू आणि जीवाणूंच्या अस्तित्वाला प्रतिबंध होतो. या तंत्रज्ञानाची चाचणी एएटीसीसी १००द्वारे तसेच आयएसओ१८१८४ मानकांवर करण्यात आली आहे.

    लुई फिलिप अल्ट्राप्रोटेक्ट डबल डिफेन्स मास्कमध्ये ५ स्तरांचा मास्क आणि ५ स्तरांचे फिल्टर पॅनल आहे. प्रत्येक मास्कमधील ५ स्तरांपैकी २ स्तर हे आरामदायी सुती आहेत, तर तीन स्तर उच्च दर्जाच्या फिल्ट्रेशनसाठी मेल्ट ब्लो पद्धतीने तयार करण्यात आले आहेत (सरकारद्वारे प्रमाणित प्रयोगशाळेतील ASTM F 2101 निकषांचे पालन करून). यामध्ये वापरण्यात आलेल्या कापडावर HeiQ व्हायरोब्लॉक तंत्रज्ञान वापरून प्रक्रिया करण्यात आली आहे. यामुळे कापडावर विषाणू आणि जीवाणूचे संभाव्य प्रदूषण टाळण्यासाठी ते नष्ट करून टाकले जातात व सर्वोच्च सुरक्षा प्राप्त होते. मास्क आणि फिल्टर हे दोन्ही धुण्याजोगे (वॉशेबल) आहेत आणि ३० वेळा सौम्यपणे धुवून पुन्हा वापरण्याजोगे आहेत.

    लुई फिलिप अल्ट्राप्रोटेक्ट डबल डिफेन्स मास्क आपल्या एर्गोनॉमिक डिझाइनमुळे, संरक्षण व सुरक्षिततेसोबत, दुप्पट आरामदायीही आहेत. मास्क घट्ट बसावा यासाठी त्यामध्ये नोज क्लिपही आहे. यामुळे गळती अजिबात होत नाही आणि चष्म्यावर आर्द्रता जमण्याची समस्याही टाळण्यात मदत होते आणि चष्मा किंवा सनग्लासेस वापरणाऱ्यांसाठी हा मास्क खूपच सोयीस्कर होतो. या मास्कचे इअर लूप्स अधिक मुलायम आहेत. त्यामुळे दीर्घकाळ हा मास्क लावून ठेवला तरी कोणताही त्रास जाणवत नाही.

    लुई फिलिपच्या सीओओ फरिदा कलियादान या लाँचबद्दल म्हणाल्या, “लॉकडाउन शिथिल होत चालला आहे आणि प्राणघातक कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत आपण नियमांचे पालन करणे व विषाणूचा प्रसार रोखण्यात आपले योगदान देणे अत्यावश्यक आहे. सध्या तरी या साथीतून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय म्हणजे सज्ज राहणे व जबाबदारीने वागणे हाच आहे. विषाणूच्या प्रसारापासून सुरक्षिततेची खात्री करण्याच्या प्रमुख उपायांपैकी डबल मास्किंग हा एक आहे आणि म्हणूनच आपल्या पोशाखाचे अविभाज्य अंग झालेल्या मास्कची योग्य निवड निर्णायक आहे. लुई फिलिप अल्ट्राप्रोटेक्ट डबल डिफेन्स मास्कचे इंजिनीअरिंग सर्वोत्तम विषाणूरोधक तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आले आहे आणि सुरक्षितता, संरक्षण व आराम यांची निश्चिती करणारे डिझाइन तंत्र यासाठी वापरण्यात आले आहे.”

    लुई फिलिपचे अल्ट्राप्रोटेक्ट डबल डिफेन्स मास्क २च्या पॅकमध्ये (यात दोन मास्क आणि दोन फिल्टर पॅनल्स आहेत) उपलब्ध आहेत. या पॅकची किंमत ६९९ रुपये आहेत. एक्स्लुजिव लुई फिलिप स्टोअर्सच्या माध्यमातून हे मास्क देशभरातील ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय louisphilippe.com ही वेबसाइट आणि लुई फिलिप ॲप यांच्यामार्फत हे मास्क ऑनलाइन विक्रीसाठीही उपलब्ध आहेत. लुई फिलिप ॲप गुगल प्लेवर तसेच ॲपल ॲप स्टोअरवर डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध आहे.

    Louis Philippe Launches 10 Level Anti Viral Ultraproject Double Defense Mask