प्रवाशांचा कमी प्रतिसाद; रेल्वेने विशेष गाड्या केल्या रद्द, जाणून घ्या

रेल्वे प्रशासनाने या काळात विशेष गाड्याही उपलब्ध करून दिल्या पण प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेने खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांनी आपल्या घरचा रस्ता धरला आहे. अनेकांनी परतीच्या प्रवासासाठी रेल्वेलाच पसंती दिली आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने या काळात विशेष गाड्याही उपलब्ध करून दिल्या पण प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेने खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

    अ) 02119 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – करमळी विशेष दि. २९.४.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत आणि
    02120 करमळी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. २८.४.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द राहतील.

    ब) 02619 लोकमान्य टिळक टर्मिनस- मंगळुरू विशेष दि. ३०.४.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत आणि
    02620 मंगळुरू – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. २९.४.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द राहतील.