Shocking incident in Mumbai An angry friend kills a friend in a fit of rage as he repeatedly loses the game of Ludo in Mobile

मुंबईतील रेल्वे अथवा बसमध्ये चारचौघांमध्ये खेळण्यात येणाऱ्या `लुडो’ या मोबाईल गेमविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. `लुडो’ हा कौशल्याचा नव्हे तर नशिबाचा खेळ म्हणून घोषित करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

    मुंबई : मुंबईतील रेल्वे अथवा बसमध्ये चारचौघांमध्ये खेळण्यात येणाऱ्या `लुडो’ या मोबाईल गेमविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. `लुडो’ हा कौशल्याचा नव्हे तर नशिबाचा खेळ म्हणून घोषित करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

    पुठ्ठ्याच्या सापशिडीसोबत येणारा `लुडो’ हा खेळ मोबाईलच्या आधुनिक काळात तरूणांसह वृद्धांच्या गळ्यातलाही ताईत झाला आहे. अनेकदा रेल्वे, बस, किंवा कामावर फावल्या वेळात लोक हा खेळ खेळताना दिसतात. मात्र, हाच खेळ सुप्रिम अँपवर पैसे लावूना खेळण्यात येत असून जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा आहे. त्यामुळे या अँपच्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत मनसेचे पदाधिकारी केशव मुळे यांनी व्ही.पी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्याविरोधात मुळे यांनी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली.

    मात्र, कनिष्ठ न्यायालयाने `लुडो’ हा कौशल्याचा खेळ असल्याचे मान्य करत एफआयआर नोंदविण्यास नकार दिला. म्हणून याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत अँड. निखिल मेंगडे यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली. त्यावर नुकतीच न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. अभय अहुजा यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, सदर प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता आहे का ? अशी विचारणा खंडपीठाने याचिकाकर्त्यांकडे केली.

    त्यावर चारजण एकत्र येऊन ५-५ रुपयांची पैज लावून हा खेळ खेळतात. त्यातील विजेत्यास १७ रुपये तर अँप चालकांना त्या मोबदल्यात ३ रुपये मिळतात. लुडोसारख्या खेळाचे रुपांतर जुगारामध्ये होत असून तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित होत आहे. त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत असल्याची बाब याचिकाकर्त्यांच्यावतीने अँड. निखिल मेंगडे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली.

    तसेच `लुडो’चा डाव हा फासा (डाईस) टाकून त्यावर येणाऱ्या अंकानुसार खेळण्यात येतो. त्यामुळे हा कौशल्याचा खेळ नसून तो निव्वळ नशिबाचा खेळ आहे. जेव्हा, लुडो खेळताना बोली लावली जाते, तेव्हा हा खेळ न उरता जुगाराचे स्वरुप घेतो, असा खुलासाही याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. त्याची दखल घेत खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी २२ जूनला निश्चित केली.