मधुकर ठाकूर यांच्या निधनाने काँग्रेसचा समर्पक लोकसेवक हरपला! : नाना पटोले 

ठाकूर यांनी झिरास ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य अशा विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्यांनी लोकांना न्याय देण्याचे काम केले. जनतेच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असायचे.

    मुंबई : अलिबाग उरणचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. ठाकूर हे काँग्रेसचे विचारांचे सच्चे पाईक होते, आयुष्यभर त्यांनी काँग्रेस विचाराची साथ सोडली नाही. त्यांच्या निधनाने काँग्रेसचा एक समर्पक लोकसेवक हरपला, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

    ठाकूर यांनी झिरास ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य अशा विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्यांनी लोकांना न्याय देण्याचे काम केले. जनतेच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असायचे. अलिबाग व परिसरात काँग्रेस पक्ष संघटना वाढवण्यासाठी त्यांनी योगदान दिले. मधुकर ठाकूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ठाकूर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.