mahametro recruitment

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने नागपूर रेल्वे प्रोजेक्टसाठी (Nagpur Railway)भरती प्रक्रिया(Recruitment Process) सुरु केली आहे. मेट्रोमधील नोकरीसाठी उमेदवारांचं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे.

  मुंबई:नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने नागपूर रेल्वे प्रोजेक्टसाठी (Nagpur Railway)भरती प्रक्रिया(Recruitment Process) सुरु केली आहे. मेट्रोमधील नोकरीसाठी उमेदवारांचं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदावर भरती केली जाणार आहे. या पदासांठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरता येईल. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख १३ जुलै २०२१  आहे.

  पदांची संख्या – नागपूर रेल्वे प्रोजेक्टसाठी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरपदासाठी १८ पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत.

  पात्रता – नागपूर मेट्रो प्रकल्पातील मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई आणि बी टेक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी उमेदवारांना mahametro.org या वेबसाईटवर अर्जाचा नमुना प्राप्त होईल.

  वयोमर्यादा – महाराष्ट्र मेट्रोने मॅनेजर पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्ष आहे. तर, असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष निश्चित करण्यात आलं आहे.

  पगार –  मॅनेजर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी ६० हजार ते १.८० लाख रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. तर, असिस्टंट मॅनेजर पदासाठी किमान वेतन ५० हजार ते १.६० लाख रुपयांपर्यंत वेतन देण्यात येणार आहेत.

  महामेट्रोच्या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत

  महाराष्ट्र मेट्रोतील नागपूर मेट्रो प्रकल्पासाठीच्या पदासाठी ऑफलाईन अर्ज भरावा लागणार आहे. महाराष्ट्र मेट्रोच्या mahametro.org या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन प्रिंट काढावी लागेल. त्यानंतर तो अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांसह तो अर्ज मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड, वीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदेशपथ, नागपूर, ४४००१० या पत्त्यावर पाठवावा लागेल.