sambhaji raje

मुलाखतीदरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र बंदला आपला पाठिंब नसल्याचे सांगितले आहे ते म्हणाले की, महाराष्ट्र बंदला माझा पाठिंबा नाही, महाराष्ट्र बंद करुन काही फायदा होईल का? असा सवाल उपस्थित करत कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे बंद नकोच, बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत.

मुंबई : मराठा आरक्षणावरुण (Maratha Reservation) मराठा समाजाने (Maratha community)  महाराष्ट्र बंदची (Maharashtra bandh) घोषणा केली आहे. परंतु खासदार संभाजीराजे छत्रपती  (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगित केल्याने मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे मराठा समाज हा पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसते आहे.

यावर मुलाखतीदरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र बंदला आपला पाठिंब नसल्याचे सांगितले आहे ते म्हणाले की, महाराष्ट्र बंदला माझा पाठिंबा नाही, महाराष्ट्र बंद करुन काही फायदा होईल का? असा सवाल उपस्थित करत कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे बंद नकोच, बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत. त्यांच्या बंदला मराठा समाजाचा पाठिंबा नाही असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

तसे राजे पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अशोक चव्हाण यांचा मला फोन आला होता. त्यांनी १ वर्ष मराठा आरक्षणावर स्थगिती असल्याने आपण ईड्ब्ल्युएसचं १० टक्के आरक्षण घेऊ अस मत व्यक्त केले होते. यावर मी त्यांना नकार दिला. यानंतर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. ईडब्ल्यूएसचे आरक्षण एका जातीसाठी नाही आहे. ते खुल्या प्रवर्गासाठी आहे. ते जर आपण घेतले तर सर्वोच्च न्यायालयात आपला कोणताही दावा राहणार नाही. त्यामुळे आपल्याला धोका निर्मान होईल असे सांगितले.

मराठा समाजाला संभाजीराजे छत्रपतींनी आवाहन केले आहे की, तरुणांनी आत्महत्या करु नये, वर्षभर कळ सोसा. सर्व नीट होईल. आत्महत्या हा पर्याय नाही. असं संभाजीराजे म्हणाले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समजाला आरक्षण हवं आहे. ओबीसी नेते मला भेटत आहेत. धनगर आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. त्यांनी कधीही साद घालावी मी त्यांच्यासोबत आहे.