maratha andolan

मराठा संघटनांच्या वतीने सुरेश पाटील यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून १ महिन्यांचा अवधी त्यांनी घेतला आहे. या शिवाय MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबतही चर्चा सकारात्मक झाल्याचं तसेच MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची चर्चा सकारात्मक झाल्याची सुरेश पाटील यांनी सांगितलं.

मुंबई : मराठा संघटनांकडून (Maratha Community) शनिवारी म्हणजेच १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र हा बंद मागे घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मराठा संघटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या चर्चेनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अपेक्षित आणि यशस्वी चर्चा झाली असून उद्याचा बंद हा तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मराठा संघटनांच्या वतीने सुरेश पाटील यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून १ महिन्यांचा अवधी त्यांनी घेतला आहे. या शिवाय MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबतही चर्चा सकारात्मक झाल्याचं तसेच MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची चर्चा सकारात्मक झाल्याची सुरेश पाटील यांनी सांगितलं. तसेच सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली. महिन्याभरात आम्ही दोन्ही प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढू असं आश्वासन सरकारकडून मिळाल्यामुळे आम्ही तात्पुरता बंद मागे घेत असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे.

मराठा संघटनांचा १० ऑक्टोबरला होणारा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला आहे. गुरुवारी ४.३० वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत या संदर्भात बैठकांचं सत्र सुरू होतं. या बैठकीसाठी विनाय मेटे, छत्रपती संभाजी महाराज आणि सुरेश पाटील या तिघांचंही शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं. प्रत्येक संघटनेची वेगवेगळी भूमिका पाहायला मिळाल्यानं आता खरंच उद्याचा बंद मागे घेण्यात येणार का? असाही प्रश्न आहे मात्र सुरेश पाटील यांनी महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याची माहिती दिली आहे.