महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचा दावा;…म्हणून मोदी लॉकडाऊन टाळतायत

वसाला रुग्णसंख्या ४ लाखापर्यंत पोहोचली आहे. पण आर्थिक पॅकेज जाहीर करावे लागू नये, यासाठी पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केलेला नाही. मागच्यावर्षी ५० हजार रुग्णसंख्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला होता.

    मुंबई: काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचऱ्या शब्दात टीका केली. ‘कुठलंही नियोजन नसणं हे कोरोनापेक्षा जास्त घातक आहे’ असे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. देशात दरदिवसाला कोरोनाची रुग्णसंख्या ४ लाखापर्यंत पोहोचली आहे. पण तरीही लॉकडाऊनचा निर्णय घेत नसल्याबद्दल, सचिन सावंत यांनी मोदींवर टीका केली.

    “दिवसाला रुग्णसंख्या ४ लाखापर्यंत पोहोचली आहे. पण आर्थिक पॅकेज जाहीर करावे लागू नये, यासाठी पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केलेला नाही. मागच्यावर्षी ५० हजार रुग्णसंख्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला होता” असे सचिन सावंत यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

    देशात सध्या बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर आणि आरोग्य सेवकांची कमतरता आहे. त्याबद्दल सावंतांनी उपरोधिकपणे मोदींचे आभार मानले आहेत. “लसींचा पुरवठा बंद झाला आहे. कोरोनापेक्षा लोक या भीतीने जास्त मरत आहेत.”

    “मोदी सरकारची बेपर्वाई आणि कुठलही नियोजन नसणं हे कोरोनापेक्षा जास्त घातक आहे” असे काँग्रेस नेते म्हणाले. “सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही पंतप्रधान मोदी शांत आहेत. आता मोदींच्या प्रिय निवडणुका संपल्या आहेत” अशी टीका सचिन सावंत यांनी केली. आज ३ लाख ६८ हजार १४७ कोरोना रुग्णांची नोंद झाली. ३,१४७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आज सलग १२ व्या दिवशी देशात ३ लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली.