rajesh tope

केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही ५११ वरुन ३५० पर्यंत कमी करण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लस दाखल होणार आहे. कोरोनाची पहिली लस मंत्र्यांना न देता आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. तसेच राज्यातील लसीकरण प्रक्रिया आता सुरूच राहणार आहेत.

मुंबई : कोविल्डशीड लसीचे मुंबईत आगमन झाल्यानंतर आता राज्यातील इतर भागांत सुद्धा लस दाखल होणार आहे. तसेच मुंबई आणि अहमदाबादमध्ये देखील कोविल्डशीड लस दाखल झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा कमी डोस मिळाले, असा आरोप राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही ५११ वरुन ३५० पर्यंत कमी करण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लस दाखल होणार आहे. कोरोनाची पहिली लस मंत्र्यांना न देता आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. तसेच राज्यातील लसीकरण प्रक्रिया आता सुरूच राहणार आहेत.

लसीकरणासाठी आठ लाख लोकांना अपलोड केलं. त्याच्या तुलनेत लस थोडी कमी आली आहे. पण जेवढी लस आली आहे ती लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये निश्चितपणे पोहोचेल. तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या रात्रीपर्यंत पोहोचेल आणि १५ जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस १०० टक्के पोहोचणार आहे. असे राजेश टोपे यांनी सांगितले.