पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या विक्रीस मनाई; गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात…

मागील काही दिवसांपासून रामदेव बाबा यांच्या कोरोनील औषधाची जागतिक स्तरावर चर्चा करण्यात आली. त्यांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी रामबाण उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाला मान्यता देखील दिली होती. परंतु हे औषध पूर्णपणे सर्वसामान्यांची दिशाभूल करणारं आणि त्यांच्या आरोग्याशी खेळणारं आहे. त्याला मान्यता कुणी दिली? असे अनेक प्रश्न केंद्रीय आरोग्य मंत्र्यांवर आयएमएकडून उपस्थित केले जात आहेत.

    मुंबई : योगगुरू रामदेव बाबांना महाराष्ट्र सरकारने जबरदस्त झटका दिला आहे. बाबा रामदेवच्या कोरोनील या औषधाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला असतानाच राज्य सरकारने कोरोनील औषधाच्या विक्रीस मनाई केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून कोरोनील औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नसल्याची माहिती दिली.

    पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले असून जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही, असं सांगतानाच जागतिक आरोग्य संघटना आणि आयएमए व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनील औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, असं देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

    मागील काही दिवसांपासून रामदेव बाबा यांच्या कोरोनील औषधाची जागतिक स्तरावर चर्चा करण्यात आली. त्यांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी रामबाण उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाला मान्यता देखील दिली होती. परंतु हे औषध पूर्णपणे सर्वसामान्यांची दिशाभूल करणारं आणि त्यांच्या आरोग्याशी खेळणारं आहे. त्याला मान्यता कुणी दिली? असे अनेक प्रश्न केंद्रीय आरोग्य मंत्र्यांवर आयएमएकडून उपस्थित केले जात आहेत.

    दरम्यान, गेल्या वर्षी संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना रामदेव बाबांनी कोरोनिल टॅब्लेटची घोषणा केली. या टॅब्लेटच्या लाँचींगनंतर त्यावरून वाद निर्माण झाला होता. जगभरातले शास्त्रज्ञ करोनावरच्या लशीसाठी संशोधन करत असताना रामदेव बाबांच्या पतंजलीने करोनावर प्रभावी ठरणाऱ्या गोळ्या तयार केल्याचा दावा केला होता.

    तसेच, या टॅब्लेट्सला त्यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाची आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची, तसेच आयसीएमआरची परवानगी देखील घेतली नव्हती. अखेर, आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅब्लेटच्या तपासणीनंतर त्या प्रतिकारक्षमता वाढवणाऱ्या गोळ्या म्हणूनच विकण्याचे निर्देश दिले. आता पुन्हा एकदा रामदेव बाबांनी तसाच दावा केला असून आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी त्यांनी एक रिसर्च पेपर देखील औषध लाँच करताना प्रकाशित केला. तरीदेखील हे औषध पून्हा एकदा वादात सापडले आहे.