महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या आणि कंगना रनौत कार्यालयावर तोडकाम प्रकरणावरुन आज हिवाळी अधिवेशात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

हे प्रकरण न्यायालयात आहे त्यावर चर्चा करू नको असा आक्षेप सत्ताधार्‍यांनी घेतला. यनंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी  सरकारवर हल्लाबोल  केला.

महाराष्ट्र काय पाकिस्तान नाही, सत्ता डोक्यात जावू देऊ नका, कायद्याने वागा, असा पलटवार फडणवीस यांनी केला. कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी काय बोलले त्याचे आम्ही समर्थन करत नाही.  मुख्यमंत्र्यांचा उल्लेख हा आदरानेच केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अर्णब गोस्वामी जे बोलले ते चुकीचे आहे. कंगनाच्या ट्विटचे समर्थन नाही. चुकीचे बोलले गेले असेल तर अवमान झाल्याचा खटला आहे, पण कोणाचे घर तोडता येत नाही असे फडणवीस म्हणाले.

आमच्या विरोधात बोलाले तर केस करू हे बरोबर नाही. आज कायद्याचे राज्य दिसत नाही अशी टीका फडणवीस यांनी केली.