लालबागचा राजा यंदा विराजमान होणार!

गणेश भक्तांच्या विनंतीवरून यावर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा गणेशोत्सव राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच साजरा केला जाईल. असेही मंडळाने जाहीर केले आहे. तसेच, गणेश मूर्तींच्या उंचीसंदर्भात सरकारने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे, यावेळी लालबागच्या राजाची मूर्ती केवळ चार फुटांचीच असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे आता अनेक भक्तांना गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेता येणार आहे.

    मुंबईची शान असलेला ‘ लालबागचा राजा ‘चा गणेशोत्सव यंदा साजरा होणार आहे. लालबागचा राजाच्या लाखो भाविकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला असून कोविड नियम पाळून यंदा लालबागच्या राजाचं आगमन होणार आहे. गेल्या वर्षी भीषण कोविड स्थिती लक्षात घेत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती.

    गणेश भक्तांच्या विनंतीवरून यावर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा गणेशोत्सव राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच साजरा केला जाईल. असेही मंडळाने जाहीर केले आहे. तसेच, गणेश मूर्तींच्या उंचीसंदर्भात सरकारने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे, यावेळी लालबागच्या राजाची मूर्ती केवळ चार फुटांचीच असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे आता अनेक भक्तांना गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेता येणार आहे.

    गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेणेशोत्सवाऐवजी “आरोग्य उत्सव” साजरा केला होता. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गेणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले होते. याशिवाय अनेक मंडळांनीही गेल्या वर्षी आरोग्य विषयक उपक्रम राबवले होते.

    करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच सर्व नियम पाळून यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शनाची योग्य व्यवस्था मंडळातर्फे केली जाणार आहे. गेल्यावर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे उत्सव रद्द करण्यात आला होता व त्याऐवजी आरोग्य उत्सव आम्ही साजरा केला होता. यंदा राजाचं आगमन होत असल्याने लालबागच्या राजाच्या मंडपात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष घुमणार आहे, असे नमूद करत साळवी यांनी आनंद व्यक्त केला.