दहा वर्षानंतर महाराष्ट्रातील आमदारांना मिळाली गूड न्यूज; स्थानिक विकास निधीत एक कोटींची घसघशीत वाढ

दहा वर्षानंतर महाराष्ट्रातील आमदारांना गूड न्यूज मिळाली आहे. राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटींची घसघशीत वाढ करण्यात आली आहे.

    मुंबई : दहा वर्षानंतर महाराष्ट्रातील आमदारांना गूड न्यूज मिळाली आहे. राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटींची घसघशीत वाढ करण्यात आली आहे.

    विधानपरिषदेचे ७८ आणि विधानसभेचे २८८ आमदार आहेत. या या आधी २०११ – १२ पासून प्रतिवर्षी प्रत्येक आमदाराला दोन कोटींचा विकास निधी मिळत आहे. आता यात एक कोटींची वाढ झाली आहे. यापुढे स्थानिक विकास निधी अंतर्गत आमदारांना प्रतिवर्षी तीन कोटी रुपये मिळणार आहेत.

    बांधकाम आणि इतर साहित्याच्या दरांमध्ये झालेली भाववाढ तसेच आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत यापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या वास्तूंची देखभाल आणि दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधी विचारात घेत स्थानिक विकास निधीत वाढ करण्यात आली आहे.