महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात बदल होणार; गृहमंत्र्यांचे संकेत

पोलिसांच्या गणवेशाला बघून भल्याभल्यांना कापरे भरते. महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या कर्तृतवाने खाकी करडा रंग असलेल्या या गणवेशाची प्रतिमा जोपासली आहे; मात्र येत्या काळात पोलिसांच्या गणेवशाच्या स्वरूपात बदल करण्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

मुंबई (Mumbai).  पोलिसांच्या गणवेशाला बघून भल्याभल्यांना कापरे भरते. महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या कर्तृतवाने खाकी करडा रंग असलेल्या या गणवेशाची प्रतिमा जोपासली आहे; मात्र येत्या काळात पोलिसांच्या गणेवशाच्या स्वरूपात बदल करण्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

पोलीसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा असून त्याात बदल करावेत अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी केली आहे. या मागणीचा विचार करून राज्यातील पोलिसांचा गणवेश बदलणार असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. पोलिसांच्या गणवेशात बदल झाल्यानंतर गणवेशात हाफ जॅकेटचा समावेश होणार असल्याचं सांगितले जात आहे. शिवाय लेदर बुटांऐवजी काळ्या रंगाचे स्पोर्ट शूज पोलिसांच्या गणवेशात दाखल होणार आहेत.

पोलिसांचा गणवेश गैरसोईचा असल्याची सूचना माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी दिली आहे. तर त्यांच्या सूचनेचा विचार करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले आहेत. काही वर्षांपीर्वी पोलिसांच्या टोपीत बदल करण्यात आले होते. तर आता पोलिसांचा पूर्ण गणवेश बदलण्याची सूचना वरिष्ठ अधिकार्‍यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.