udhav thackrey

महाराष्ट्रात लहान मुले आणि बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी बाल रोगविषयक निर्माण करण्यात आला आहे. कोरोनाचा धोका टळला नसल्याचा इशारा देतानाच मुख्यमंत्री ठाकरेंनी तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास महाराष्ट्राची तयारी असल्याचेही स्पष्ट केले. तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध राहिले पाहिजे

  मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालताच महाराष्ट्रात 1 जूनपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम आहेत. तिसऱ्या लाटेची संभाव्य चाहूल लागताच अन्य राज्यांचाही कल लॉकडाऊन वाढविण्याकडेच असल्याचेही दिसून येत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससह राज्यातील जनतेशी संवाद साधला.

  महाराष्ट्रात लहान मुले आणि बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी बाल रोगविषयक निर्माण करण्यात आला आहे. कोरोनाचा धोका टळला नसल्याचा इशारा देतानाच मुख्यमंत्री ठाकरेंनी तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास महाराष्ट्राची तयारी असल्याचेही स्पष्ट केले. तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

  पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झाला. सध्या दुसरी लाट आहे. या लाटेत युवा आणि मध्यमवयीन नागरिकांना संसर्ग होत आहे. आता मुलांचा वर्ग राहिलेला आहे आणि त्याच्यात ही लाट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवल्यानंतर आपण शांत बसणे शक्य नाही. कोरोनाविरोधातील लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राने केली आहे.

  18+ लसीकरण करण्याची राज्याची तयारी

  राज्यात सध्याच्या घडीला 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची आपली तयारी असल्या म्हणत त्यांनी लसींचा पुरवठाच होत नसल्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळे येत असल्याची वस्तुस्थितीही त्यांनी स्पष्ट केली. 12 कोटी लसींचे डोस एकरकमी घेण्याची तयारी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

  रोगापेक्षा उपचार भयानक होऊ नये

  लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. पण, रोगापेक्षा उपचार भयानक होऊ नये याची मात्र काळजी घेण्याचा आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे , योग्य मार्गदर्शन करावे, असे ते म्हणाले.

  सुविधा वाढविणार

  • लहान मुलांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना
  • दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला पण आपण आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पाउले टाकली आहेत, असे उद्धव म्हणाले.
  • जूननंतर लस पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता. त्यानंतरच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने होणार.