महाराष्ट्रात १ लाख कोरोना मृत्युंची नोंद, या पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू

९ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर ४५३ दिवसांत १ लाख १३० नागरिकांचा कोरोनानं बळी घेतलाय. दिवस आणि मृत्युंचा सरासरी दर लक्षात घेतला, तर महाराष्ट्रात दररोज २२० नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेल्याचं दिसून आलंय. 

    देशात कोरोनानं गेल्या दीड वर्षांपासून धुमाकूळ घातलाय. महाराष्ट्रानं देशात सर्वाधिक कोरोना बळी घेतलेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात झालेल्या कोरोना मृत्युंच्या संख्येन आता १ लाखांचा आकडा ओलांडला आहे. महाराष्ट्र हा जर स्वतंत्र देश मानला, तर महाराष्ट्रानं १८० देशांना या बाबतीत मागे टाकलंय.

    देशात आतापर्यंत कोरोनामुळे ३ लाख ४७ हजार २८ जणांचा मृत्यू झालाय. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक १ लाख १३० मृत्युंची नोंद झालीय. राज्यातील ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. पहिल्या लाटेत अनुभवाची कमतरता, कमी बेड्स, आवश्यक औषधांचा तुटवडा अशा समस्यांमुळे आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि इतर औषधांचा तुटवडा भासल्यामुळे अनेक आव्हाने महाराष्ट्रासमोर निर्माण झाली होती.

    ९ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर ४५३ दिवसांत १ लाख १३० नागरिकांचा कोरोनानं बळी घेतलाय. दिवस आणि मृत्युंचा सरासरी दर लक्षात घेतला, तर महाराष्ट्रात दररोज २२० नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेल्याचं दिसून आलंय.

    राज्यातील सर्वाधिक मृत्यु झालेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि नाशिकचा समावेश आहे.