महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण; न्या. आर.डी पाटील यांच्यासमोर सुनावणी निश्चित

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटींच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी सुरू असलेला खटल्याची सुनावणी सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधिश आर.डी पाटील यांच्या समोर २५ जून रोजी निश्‍चित करण्यात आली आहे.

    मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटींच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी सुरू असलेला खटल्याची सुनावणी सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधिश आर.डी पाटील यांच्या समोर २५ जून रोजी निश्‍चित करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र राज्य सहकारी बँक २५ हजाराचा घोटाळा खटल्याची सुनावणी मागील दोन वर्षांपासून विशेष न्या. ए.सी. दागा यांच्यासमोर सुरू होती. दरम्यानच्या काळात या खटल्यातील मुळ तक्रारदार सुरिंदर अरोरा यांच्यासह माजी मुख्यमंत्री कै.वसंतदादा पाटील यांच्या पत्नी सुशालीनीताई पाटील , निलंगणाचे माजी आमदार माणिकराव जाधव, पारनेर साखर कारखान्याचे संचालक किसन कावड आणि समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावतीने अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी विशेष न्या.व्ही.सी दागा यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत खटला अन्य न्यायाधिशांकडे वर्ग करण्याची विनंती करणारा अर्ज प्रधान न्यायाधिशाकडे केला होता.

    या अर्जावर प्राथमिक सुनावणीही पार पडली. दरम्यान प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून ए.व्ही दागा यांच्याकडील विशेष न्यायालयाचा पदभार न्या. आर.डी. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला. यामुळे अ‍ॅड. तळेकर यांनी खटला अन्य न्यायाधिशांकडे वर्ग करण्याचा अर्ज मागे घेतला आहे.