महाराष्ट्रातआजपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु, संभ्रमानंतर आता प्रत्यक्ष दिलासा, असे आहेत नियम आणि निकष

कडक निर्बंध असणाऱ्या राज्यातील एकेक निर्बंध शिथिल व्हायला आजपासून सुरुवात करण्यात आलीय. सरसकट महाराष्ट्रात एकच स्थिती मात्र असणार नाही. त्या त्या भागातील कोरोना पॉझिटीव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यांच्या आधारे कुठल्या विभागाला किती दिलासा मिळणार, हे ठरवण्यात येणार आहे. 

  आयुष्य पूर्ववत कधी होणार, याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या महाराष्ट्रवासियांना आजपासून खरा दिलासा मिळायला सुुरवात होणार आहे. कडक निर्बंध असणाऱ्या राज्यातील एकेक निर्बंध शिथिल व्हायला आजपासून सुरुवात करण्यात आलीय. सरसकट महाराष्ट्रात एकच स्थिती मात्र असणार नाही. त्या त्या भागातील कोरोना पॉझिटीव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यांच्या आधारे कुठल्या विभागाला किती दिलासा मिळणार, हे ठरवण्यात येणार आहे.

  राज्य सरकारच्या अधिकृत आदेशानुसार आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून त्यात महापालिका क्षेत्रं आणि जिल्हे यानुसार महाराष्ट्राची विभागणी करण्यात आलीय. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद वसई-विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, आणि कल्याण डोंबिवली या महापालिका स्वतंत्र विभाग म्हणून गणल्या जातील. याशिवाय इतर ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्हा हा वेगळा विभाग म्हणून गणला जाणार आहे.

  अशा असतील लेव्हल

  लेव्हल पॉझिटीव्हिटी दर किती ऑक्सिजन बेड भरले आहेत व्यवहारांची वेळ
  ५ टक्क्यांपेक्षा कमी २५ टक्क्यांहून कमी नियमित
  ५ टक्क्यांपेक्षा कमी २५ ते ४० टक्के बंद जागा वगळता नियमित
  ५ ते १० टक्के ४० टक्क्यांहून अधिक संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
  १० ते २० टक्के ६० टक्क्यांहून अधिक संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मात्र विकेंडला बंद
  २० टक्क्यांपेक्षा जास्त ७५ टक्क्यांहून अधिक जैसे थे स्थिती
  हे सुद्धा वाचा

  यासाठी निकष दर गुरुवारी तपासले जातील.गुरुवारच्या स्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. गुरुवारी जी स्थिती असेल, त्याचा आढावा घेऊन सोमवारपासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. म्हणजेच गेल्या गुरुवारी जी स्थिती होती, त्यानुसार या आठवड्यात स्थिती असेल, तर पुढील सोमवारपासून कुठल्या स्तरात आपला विभाग मोडणार, हे येत्या गुरुवारच्या स्थितीवरून मोजलं जाणार आहे.