महाराष्ट्राने मृत्यू लपवले हा आरोप सहन करणार नाही : राजेश टोपे

आकडेवारी लपवली गेल्याची टीका विरोधकांनी सरकारवर केली. विरोधकांनी कोरोनाच्या आकडेवारीच्या लपवालपवीवरून सरकारवर टीका केली. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू लपवले हे आरोप कधीही सहन करणार नाही. हे अत्यंत खोटं असून महाविकासआघाडीने मृत्यू लपवलेले नसल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

    मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले प्राण गमावले. कोरोनाने एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांचा आणि कोरोनाने मृत्यु होणाऱ्यांचा आकडे वाढला. नव्या बाधितांचा आकडेवारी ही जवळपास 50 ते 60 हजारांवर पोहोचला होता.

    दरम्यान याचं पार्श्वभूमीवर आकडेवारी लपवली गेल्याची टीका विरोधकांनी सरकारवर केली. विरोधकांनी कोरोनाच्या आकडेवारीच्या लपवालपवीवरून सरकारवर टीका केली. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू लपवले हे आरोप कधीही सहन करणार नाही. हे अत्यंत खोटं असून महाविकासआघाडीने मृत्यू लपवलेले नसल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

    देशात महाराष्ट्र अॅक्टिव्ह केसेसमध्ये आणि मृतांच्या बाबतीत क्रमांक एकवर होता. आम्ही कधीही लपवलेलं नाही. खासगी रुग्णालयांनी तिथे झालेल्या मृतांचे आकडे वेळेवर दिले पाहिजेत. बऱ्याचदा खासगी रुग्णालयांकडून 15 दिवस आकडे उशिरा दिले जातात, हे याचं कारण असू शकतं. रिकन्सिलिएशनमुळेसुद्धा मृतांची संख्या पोर्टलवर अपलोड झालेली नसेल. त्यामुळे ही संख्या कमी राहाते, पण ती लपवली असं होत नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, गर्दीची भिती नाही. ज्या पद्धतीने मास्कशिवाय लोक गर्दी करतायत, त्यांची मला जास्त भिती वाटते. त्यामुळे तिसरी लाट अजून लवकर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असंही टोपे म्हणाले.