महाराष्ट्राचा लसीकरणात नवा विक्रम, एका दिवसात तब्बल ‘इतक्या’ लाख लोकांचं लसीकरण

महाराष्ट्राचं देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणात नवनविन विक्रम होत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत राज्यात शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यत 5 हजार 200 पेक्षा अधिक लसीकरण केंद्रावर 10 लाख 96 हजार 493 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.

    मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. राज्यात जनतेचं लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. शनिवारी राज्याने आणखी एक नवीन विक्रम नोंदवला आहे.

    दरम्यान त्यामुळे महाराष्ट्राचं देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणात नवनविन विक्रम होत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत राज्यात शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यत 5 हजार 200 पेक्षा अधिक लसीकरण केंद्रावर 10 लाख 96 हजार 493 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.

    काही दिवसांपूर्वी राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या डोसची संख्या ही 5 कोटी पार गेली आहे. शनिवारी झालेल्या या लसीकरणात जवळपास एकाच दिवशी 11 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. हा विक्रम प्रस्थापित केल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रनेनं केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. राज्यात दिवसाला 10 लाखांपेक्षा अधिक जणांचे लसीकरण होऊ शकते. हे आरोग्य यंत्रनेनं सिद्ध केलं आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

    शनिवारी राज्यात 10 लाख 96 हजार 493 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलं आहे. राज्यातील हा नवीन विक्रम आहे. याआधी 3 जुलै रोजी 8 लाख 11 हजार नागरिकांना लस दिली होती. हा विक्रम 14 आँगस्ट रोजी मोडीत निघाला असून, दिवसभरात 9 लाख 64 हजार 460 नागरिकांना लस देण्यात आली.