बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्राची बदनामी; अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचा भाजपावर निशाणा

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूला एक वर्ष लोटले आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले होते. मात्र, त्यानंतर वेगवेगळे युक्तीवाद केले गेले. वर्षभरानंतरही या प्रकरणावरील राजकारण थांबलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपाला बिहार निवडणूक लढवायची होती, म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते, असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपावर केला आहे.

    मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूला एक वर्ष लोटले आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले होते. मात्र, त्यानंतर वेगवेगळे युक्तीवाद केले गेले. वर्षभरानंतरही या प्रकरणावरील राजकारण थांबलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपाला बिहार निवडणूक लढवायची होती, म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते, असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपावर केला आहे.

    सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत असताना, या प्रकरणाचे ज्या प्रकारे राजकारण झाले आहे, हे लोकांच्या समोर आहे. मुंबई पोलिस रीतसर तपास करत असताना, या घटनेचा एफआयआर बिहारमध्ये दाखल करण्यात आला. मग बिहार सरकारने निर्णय घेऊन हा तपास सीबीआयकडे सोपवला आणि एक वर्ष होऊन देखील याच्यात काय निष्पन्न झाले? या तपासात आत्महत्येशिवाय दुसरे काही आहे का? याबाबत आजपर्यंत सीबीआयकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही, असे मलिक म्हणाले. तसेच, आत्महत्या आहे की कुणी हत्या केली? याची माहिती सीबीआयने दिली पाहिजे, अशी मागणी देखील नवाब मलिक यांनी केली आहे.

    हे सुद्धा वाचा