corona test

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९३.६० टक्क्यांवर पोहचला आहे.  कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून मृत्यू दरही घटला आहे. 

मुंबई : मंगळवारी राज्यात ३,४४२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  तर ४,३९५  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९३.६० टक्क्यांवर पोहचला आहे.  कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून मृत्यू दरही घटला आहे.

राज्यात आतापर्यंत १७,६६,०१० करोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे बरे ९३.६० % एवढे झाले आहे. आज राज्यात ७०  करोना मृत्यूची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,८६,८०७ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ७१,३५६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात मंगळवारी ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ७०  मृत्यूपैकी ४७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवड्यातील अाहेत. दरम्यान, अाजपर्यंत तपासण्यात अालेल्या १,१८,०६,८०८ प्रयोगशाळा नुमन्यांपैकी १८,८६,८०७ (१५.९८ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२४,०५९ व्यक्ती हाेमक्वारंटाईन असून ४,३१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.