महाराष्ट्रातही वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधानांचा भेदभाव का? : मविआ नेत्यांचा सवाल

चक्रीवादळाने महाराष्ट्रातही नुकसान झालं आहे. त्यांनी महाराष्ट्रातही यायला पाहिजे होते. प्रशासनावर ताण येऊ नये म्हणून त्यांची भूमिका असेल तर ती चांगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कंट्रोलरुममधून परिस्थिती हाताळत आहेत. असे पटोले म्हणाले.

  मुंबई : महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तोक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत.

  सात जिल्ह्यात वादळाने प्रंचंड हानी

  महाराष्ट्राबद्दल असलेल्या या भेदभावाबद्दल नवाब मलिक यांनी व्टिट करत सवाल उपस्थित केला आहे. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पंतप्रधानाच्या या दौ-याबद्दल आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रात सात जिल्ह्यात वादळाने प्रंचंड हानी झाल्याचे सांगत पटोले म्हणाले की, मोदी यांनी महाराष्ट्रात पहाणी दौरा का केला नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौरा करत आहेत.

  मात्र चक्रीवादळाने महाराष्ट्रातही नुकसान झालं आहे. त्यांनी महाराष्ट्रातही यायला पाहिजे होते. प्रशासनावर ताण येऊ नये म्हणून त्यांची भूमिका असेल तर ती चांगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कंट्रोलरुममधून परिस्थिती हाताळत आहेत. असे पटोले म्हणाले.

  किमान मुंबईचा दौरा करा

  मात्र, भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्टिट करत मविआ नेत्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की,  वादळात नुकसान झाले त्यासाठीची मदत व सर्वात महत्वाचे लोकांना आधार देण्यासाठी पंतप्रधान गुजरातेत तर विरोधीपक्षनेता फडणवीस कोकणात पोहोचले मात्र राज्याचे मुख्यमंत्री जे तुम्ही आमचे कुटुंबप्रमुख आहात किमान मुंबईत तर दौरा करा त्रस्त जनता मातोश्रीबाहेर आंदोलन करते आता तरी निघा असे व्टिट करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच सवाल केला आहे.